भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपुर्ण ठिकाण म्हणजेच सांची स्तुप. आपल्याला कदाचीत माहीतच असेल कि सांची स्तुपाची स्थापना का आणि कोणी केली ? सांची स्तुपाची स्थापना इसवी सन पुर्व 300 मधे सम्राट अशोक याने केली, बौद्ध धर्माचे संस्थापक महान गौतम बुद्ध यांचे अवशेष ठेवण्यासाठी सांची स्तुपाची निर्मीती करण्यात आली होती.
हि वास्तु भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील सांची या शहरात आहे. सांची स्तूप म्हणजेच भारतातील सर्वात प्राचीन दगडी रचना आणि भारतीय वास्तुकलेचे महत्त्वपूर्ण उदाहरण. यात गोलार्ध वीट संरचना आहे जी बुद्धांच्या अवशेषांवर बांधली गेली आहे. स्तुपाच्या वरील बाजुस एक छत्रीसारखी संरचना आहे, बुध्दांच्या अवशेषांचा सन्मान आणि आश्रयस्थान देने हा या संरचनेचा उद्देश आहे.
सांची स्तूपातील शिल्पे, स्मारके आणि रमणीय बागांना युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोशीत केले आहे. या स्तूपाचे मूळ बांधकाम सम्राट अशोक यांच्या देखरेखीखाली झाले. सांचीच्या परीसरात असंख्य स्तूप आहेत, यांत सातधारा, भोजपुर, अंधेर आणि सोनारी यांचा समावेश होतो.
सांची स्तुपचा इतिहास
सांची स्तूपची पायाभरणी भारताच्या महान सम्राटांपैकी एक, मौर्य घरान्यातील सम्राट अशोक यांनी केली. भगवान बुद्धांच्या अवशेषांचे पुनर्वितरण करण्यासाठी त्यानी इसवी सन पुर्व 300 मधे स्तूपांची स्थापना केली. हे विशाल गोलार्ध गुंबद 54 फूट उंच असून तेथे मध्यवर्ती खोलीचा समावेश आहे जेथे बुद्धांचे अवशेष ठेवले आहेत. सध्याच्या सांची स्तुपाची गोलार्ध इमारत ही व्यासाने सुरुवातीच्या इमारतीपेक्षा दुप्पट आहे. अशोकाची पत्नी, देवी आणि त्यांची मुलगी विदिशा यांच्या देखरेखीखाली या स्मारकाची निर्मिती झाली. स्कीस्म एडीक्ट चे शिलालेख असलेले खांब तसेच शंखलीपी येथे पाहण्यास मिळते.
सांची स्तूपचा तळाचा भाग अद्यापही जमीनीखाली आहे, तर वरचा भाग हा छत्री सारख्या संरचनेखाली ठेवलेला आपल्याला पाहन्यास मिळतो. मौर्य साम्राज्याच्या सेनापती पुष्यमित्र शुंगाने इ.स.पू. 185 मध्ये शेवटचा मौर्य सम्राट बृहद्रथ मौर्य याचा वध केला आणि शुंग राजघराण्याची स्थापना केली. असे मानले जाते की शुंग सत्तेत आला त्या काळात इ.स.पू. दुसर्या शतकात स्तुप नष्ट झाले होते. नंतर त्याचा मुलगा अग्निमित्राने याची पुनर्बांधणी केली. शुंगा राजवंशाच्या कारकिर्दीत स्तूपचा विस्तार त्याच्या मूळ आकारापेक्षा जवळपास दुप्पट झाला. यावेळी वास्तविक वीटेची संरचना असलेल्या स्तूपावर दगडांद्वारे सपाट घुमट बांधण्यात आले. सांची स्तुपावर तीन छत्रीच्या आकाराच्या संरचना आहे. ह्या संरचना धर्मचक्र संकल्पनेचे प्रतीक आहे. स्तुपाच्या पायाजवळ दुहेरी जीन्याद्वारे पोहोचता येते.
जानुन घेउ सांची स्तुपाची संरचना
सांची स्तूप आपल्या अनन्यसाधारण वास्तूसाठी प्रसिद्ध आहे. अंडा, हर्मिका, छत्र आणि स्तूपातील इतर अनेक घटक हे या ठिकानी भेट देऊनच अनुभवले जाउ शकतात.
1) एक अर्धगोल संरचना (अंडा)
अंडा ही एक अर्धगोल आकाराची संरचना आहे ज्यात गौतम बौध्दांचे अवशेष ठेवले आहेत. यात भरीव कोर आहे ज्यामध्ये प्रवेश करणे शक्य नाही. सुरुवातीच्या स्तूपांमध्ये बुद्धाचे वास्तविक अवशेष होते जेथे अवशेष कक्ष अंड्याच्या आत पुरला होता, ज्याला तबेना म्हणतात. काळानुसार अर्धगोल संरचना, विश्वाच्या मध्यभागी असलेल्या देवांच्या घराचे वैशिष्ट्य दर्शविणारी प्रतीकात्मक संरचना बनली.
2) एक चौकोनी कठडा (हर्मीका)
बौध्द संरचनेमध्ये हर्मीका हे चौकोनी आकाराचे कुंपन आहे जे स्तुपच्या माथ्यावर स्वर्ग दर्शवते. यश्टी हा निमुळता मनोरा आहे ज्यामध्ये तीन चक्र आहेत, यश्टी ची सुरुवात हर्मीकेच्या मध्य भागातुन होते. यश्टी विश्वाला सूचित करते.
3) मध्यभागी असलेला खांब ज्यावर तिहेरी छत्रीच्या आकाराची संरचना आहे. (छत्र)
छत्र ही संकल्पना छत्रीवरुन घेण्यात आली आहे. छत्र हे स्तुपाच्या वरील भागावर आढळुन येते, छत्र स्तुपाचे वाइट घटकांपासुन रक्षन करते. मध्यभागी असलेला खांब छत्रास धरुन ठेवतो ही संकल्पना संपुर्न विश्वाचा मध्य दर्शवते. वरील तीन छत्र्या ह्या बौध्दाची तीन रत्ने दर्शवीतात (बौध्द, धर्म आणि संघ).
सांची स्तूपच्या या तीन मूलभूत संरचनांबरोबरच आसपास, काही दुय्यम संरचना देखील आहेत या खालीलप्रमाणे.
तोरन
ही मुद्रा असलेली भिंत आहे. यावर तीन आडवे दगड आहेत. ही भिंत फिकट निळ्या रंगामध्ये सुशोभीत आहे, यावर तोरने पिवळ्या अक्षरांत लिखीत आहेत.
मेधी
हा एक प्लॅटफाॅर्म आहे ज्याच्या सभोवताली कठडे आहेत. मेधी अंडाला उचलुन धरते आणि आधार देते. या संरचनेचा वापर सांची स्तुपची प्रदक्षिणा करण्यासाठी केला जात असावा असे मानले जाते.
सांची स्तुपाची संरचना |
सांची स्तुप बाबत काही रोचक तथ्य
1) चौदाव्या शतकापासुन ते सन 1818 पर्यंत सांची स्तुप दुर्लक्षीत राहीला. त्यानंतर टायलर नावाच्या ब्रीटीश अधिकाऱ्याने हा स्तुप शोधुन काढला.
2) सर जॉन मार्शल यांनी येथे 1919 मध्ये पुरात्व संग्रहालय उभारले. या संग्रहालयास आज सांची संग्रहालय म्हनुन ओळखले जाते.
3) सांची स्तुप भारतातील सर्वात प्राचीन दगडी संरचना आहे.
4) या जागेला ऐतिहासिक महत्त्व असले तरीही, भगवान बुद्ध यांनी या ठिकाणास कधीही भेट दिली नाही.
भेट देण्यासाठीचा सर्वोत्तम काळ
नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी सांचीला भेट देण्यासाठी उत्तम काळ माणला जातो, कारण या ठिकाणी तापमान उन्हाळ्यात बरेच जास्त असते. मान्सूनमध्ये सांचीला भेट दिल्यास आपल्याला एक भव्य अनुभव मिळेल.
भेट देन्याची वेळे: सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत कोणत्याही दिवशी सांचीस भेट देता येते.
भेट देण्यासाठी कसे जाल
सांची स्तूप हे भोपाळ जवळच असल्याने प्रवासी भोपाळ ते स्तूप संकुलाकडे टॅक्सी घेऊन जाणे पसंत करतात. सांचीचे सर्वात जवळचे विमानतळ म्हणजे भोपाळच्या गांधी नगरमधील राजा भोज विमानतळ. सांचीचे स्वतःचे एक रेल्वे स्टेशन आहे जे देशाच्या विविध भागाशी चांगले जोडलेले आहे. सांची रेल्वे स्थानक सांची स्तुपपासुन फक्त 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तुम्ही खालील नकाशा पाहु शकता.
भेट देन्यासाठी येथील जवळची ठिकाणे
1) भिमबेटका लेण्या
2) अप्पर लेक
3) शौकत महल
4) उदयगीरी लेण्या
0 टिप्पण्या