कार्ला लेणी लोणावळ्या जवळील कार्ला या गावाजवळ आहे. या लेण्या लोणावळ्यापासुन 11 किमी अंतरावर आहे. भाजा लेणी, पाटण बौद्ध लेणी, बेडसे लेणी आणि नाशिक लेणी या लेण्यादेखील या भागात पाहण्यास मिळतात. या ठिकाणी एकवीरा देवीचे देवस्थान आहे. या लेण्या इ.स.पू. 2 ऱ्या शतकापासुन ते इ.स. 5 व्या शतका पर्यंत बांधल्या गेल्या. कार्ला लेण्या या महाराष्ट्रातील सर्वात जुन्या व लहान लेण्यांपैकी एक आहेत.
कार्ला लेणीचा इतिहास
कार्ला लेण्या या बौध्दीष्ट लेण्या आहेत. या एकुण 16 लेण्या आहेत. बर्याच लेणी बौद्ध धर्माच्या सुरुवातीच्या हिनयान टप्प्यातील आहेत. यातील तीन लेण्या या बौद्ध धर्माच्या महायान टप्प्यातील आहेत. या लेण्यांमध्ये चैत्यगृह ही मुख्य लेणी आहे. चैत्यगृह हे त्या काळचे एक भव्य प्रार्थणा स्थळ होते. चैत्यगृहाची निर्मीती इ.स.पू. पहील्या शतकात झाली होती. चैत्यगृहाच्या छतामध्ये लाकडाचे कोरीव काम पाहण्यास मिळते. चैत्यगृहात डाव्या आणि उजव्या बाजुस नक्षीदार कोरलेले खांब आपणास पाहण्यास मिळतात. या खांबांवर पुरुष, स्त्री, हत्ती, घोडे यांचे शिल्प पाहण्यास मिळते. प्रवेशद्वाराजवळ असलेल्या मोठ्या खिडकीतुन सुर्यप्रकाश आत येतो आणि थेट चैत्यगृहामध्ये असलेल्या स्तुपावर पडतो.
इतर 15 लेण्या या आकाराने लहान आहेत, यांना विहार म्हटले जाते. यांचा वापर राहण्यासाठी व प्रार्थनास्थळ म्हनुन केला जात असे. या लेण्या गौतम बुध्दांना संबोधतात. येथील प्रवेशद्वाराजवळ सिंहांचा एक विशाल स्तंभ आहे, जो उत्तर प्रदेशातील सारनाथ येथे सम्राट अशोकाने उभारलेल्या सिंहाच्या स्तंभाची आठवन करुन देतो.
ठिकाण
महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळील कार्ला या गावामध्ये आपणास या लेण्या पाहण्यास मिळतात. कार्ला गावाच्या वर असलेल्या डोंगरामध्ये या लेणी कोरलेल्या आहेत. कार्ला लेण्या मुंबई-पुणे महामार्गास लागुनच आहेत. या लेण्या मुंबईपासुन जवळपास दोन तासाच्या अंतरावर आहेत. आणि पुण्यापासुन एक तासाच्या अंतरावर आहेत.
कसे जाल
आपल्याकडे स्वतःचे वाहन नसल्यास सर्वात जवळचे रेल्वे स्थानक चार किलोमीटर अंतरावर मालवली येथे आहे. या स्थानकावर पुण्याहून लोकल ट्रेनने जाता येते. मोठे लोणावळा रेल्वे स्टेशनही जवळच आहे आणि मुंबईहून येणाऱ्या गाड्या तेथे थांबतात. रेल्वे स्थानकावरुन लेण्यांपर्यंत येण्यासाठी रिक्षा उपलब्ध आहेत. जर तुम्ही बसद्वारे प्रवास करत असाल तर लोणावळ्या मध्ये उतरा. तुम्ही खालील नकाशा पाहु शकता.
कार्ला लेण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी डोंगराच्या पायथ्यापासून 350 पायर्या चालाव्या लागतात किंवा कार पार्कपासून 200 पायऱ्या चालव्या लागतात. लेण्यांच्या आत जाण्यासाठी तिकिटांची आवश्यकता असते. तिकिट बूथ डोंगराच्या माथ्यावर प्रवेशद्वाराजवळ आहे. प्रवेश शुल्क भारतीयांसाठी 25 रुपये आणि परदेशी पर्यटकांसाठी 300 रुपये आहे. लेण्यांच्या बाजूला एकवीरा देवीचे मंदिर देखील आहे. येथे नाष्टा व इतर खाद्य पदार्थ उपलब्ध आहेत. राहण्यासाठी हॉटेल्स लोणावळ्यामध्ये उपलब्ध आहेत.
भेट देण्यासाठी जवळची इतर ठिकाणे
कार्ल्याच्या दक्षिणेला आठ किलोमीटर अंतरावर भाजा लेण्या पाहण्यास मिळतात. या लेण्या कार्ला लेण्यांप्रमाणेच आहेत. जरी कार्ला लेण्यांमध्ये चैत्यगृह ही मोठी लेणी असली, तरीही भजा लेण्यांमधील काम अधिक चांगले आहे. हा परीसर कार्ला परीसरापेक्षा शांत देखील आहे. जर तुम्हाला बुध्दिष्ट लेण्यांमध्ये खरच रुची असेल तर तुम्ही जवळील बेडसे लेण्या देखील पाहु शकता.
0 टिप्पण्या