राजस्थान मधील एक आकर्शक पर्यटन स्थळ म्हणजेच जयपुरचा अमेर किल्ला. अमेर हे खरे पाहता एक शहर आहे जे राजधानी जयपुर पासुन 11 किमी अंतरावर आहे, येथील किल्ला म्हणजेच अमेर किल्ला. पर्यटक अमेर किल्ल्यास विविध नावांनी ओळखतात जसे 'अंबर पॅलेस, अमेरचा किल्ला, अमेर का किला' इत्यादी. युनेस्कोने या किल्ल्यास जागतीक वारसा म्हणुन घोशित केले आहे.
या जागेस किल्ला असे जरी संबोधले जात असले तरीही हा एक राजवाडा आहे, कारण या ठिकाणी राजघराण्यातील राजपरीवार राहत असे.
अमेर किल्ल्याचा इतिहास
अमेर शहरावर सुरुवातीला मिना जमातींचे राज्य होते. त्यानंतर कछवाहा राजपुतांनी या शहराचा ताबा घेतला. असे मानले जाते कि कछवाहा राजपुतांनी सुरुवातीस मिना जमातींसोबत मित्र संबंध ठेवले, त्यानंतर त्यांनी मिना जमातीवर हल्ला करुन अमेर शहराचा ताबा घेतला.
त्याकाळी राजस्थान मधील धुंदर प्रदेशावर कछवाहा राजपुत राज्य करत होते. अमेर शहर ही या राज्याची राजधानी, येथील अमेर किल्ला हा राजा मानसिंग पहिला याने 16 व्या शतकात बांधला.
अमेर किल्ला हा मुघलांनी देखील काबीज केला होता, नंतर महाराजा सवाई जयसिंग दुसरा याने तो परत मिळवला.
अमेर किल्ल्याची सफर पुर्ण करण्यास 45 ते 90 मिनीटे लागतात. येथे पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी भरपुर गोष्टी आहेत.
अमेर किल्ल्यामध्ये काय पहाल ?
अमेर किल्ला हा अत्यंत सुंदर आहे. येथे पाहण्यासाठी खुपकाही आहे. या किल्ल्यात काही ठिकाणं अशी देखील आहेत जी अद्याप पर्यटकांसाठी बंद आहेत. अनेक हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण देखील या किल्ल्यात झाले, जसे कि ' बाजीराव मस्तानी, मनिकर्नीका इत्यादी'.
येथे 11 महत्वाची ठिकाणे आहेत जी तुम्ही पाहु शकता.
1. गणेश पोल
राजवाड्यात प्रवेश करण्यासाठीचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच गणेश पोल. हे प्रवेशद्वार अत्यंत सुंदर आहे, पर्यटक येथे सेल्फी काढण्यासाठी जमतात. हे प्रवेशद्वार म्हणजेच मुघल आणि राजपुत कलाकुसरीचे एक उत्तम उदाहरण.
लोकांच्या मनातील भगवान गणेशाचे महत्व हे या प्रवेशद्वाराच्या नावातुन आपणास पाहण्यास मिळते. हिंदु धर्माप्रमाणे गणपती बाप्पाची पुजा प्रत्येक कार्याच्या सुरुवातीस केली जाते, कारण यामुळे कामातील अडचणी दूर होतात. यामुळे भारतातील अनेक लोकप्रिय स्थळांच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्याला गणेश प्रतीमा पाहण्यास मिळते. गणेश पोल देखील याचेच उदाहरण आहे.
तुम्ही गणेश पोल पाहण्या आधी 'सुहाग मंदिर' पाहु शकता. राजघराण्यातील स्त्रिया याचा वापर महालातून बाहेर देखरेख करण्यासाठी करत असत. त्यावेळेस राजवाड्यातील स्त्रियांना राजवाड्याबाहेर मोकळेपणाने फिरण्याची अनुमती नव्हती, यामुळे त्या सुहाग मंदीरातुन राजवाड्याबाहेर देखरेक करत असत.
2. दिवाने आम
दिवाने आम म्हणजेच त्याकाळचे कोर्ट. राजा येथे आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटायचा. विशेष प्रसंगी (जसे कि युद्ध किंवा अन्य आपत्तीत) येथे राजा आणि इतर महत्वाचे लोक भेटत असत. 16 व्या शतकात उभारण्यात आलेल्या या कोर्टाच्या भिंतींवर मुघल आणि राजपुत संस्कृतींची छाप पाहण्यास मिळते. येथील खांब हे लाल वाळुच्या खडकांपासुन बनवण्यात आले असुन त्यावर पांढरा संगमरवर पाहण्यास मिळतो.
येथील कलाकुसरीमधे हंती आणि फुलांचे नक्षीदार काम पाहण्यास मिळते. दिवाने आम येथुन माओता तलाव, दिलराम गार्डन तसेच जलेब चौक या ठिकाणांचे विहंगम दृश्य दिसते.
3. शेष महाल किंवा दिवाने खास
दिवाने खास म्हणजेच अशि जागा जिथे राजा फक्त आपल्या अत्यंत जवळील व्यक्तींशी किंवा अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींशी भेटतो. यामुळे या जागेस त्यावेळी विशेष महत्त्व होते. या ठिकाणची सजावटही आकर्षक आहे. दिवाने खासच्या आतील बाजुस लहान लहान आरशांद्वारे केलेली सजावट पाहण्यास मिळते. शेष या शब्दाचाच अर्थ आरसा, यामुळे या जागेस शेष महाल देखील म्हणतात.
रात्रीच्या वेळेस भिंतींवरील आणि छतावरील लहान आरशांद्वारे प्रकाश परावर्तीत होतो व आकाशात चांदने असल्याप्रमाणे देखावा निर्माण होतो. आरशांचा कलाकुसरीसाठी वापर हा पहील्यांदा मुघल साम्राज्याचा सम्राट शाह जहान याने केला होता.
शेष महाल मधील आरशांच्या कलाकुसरी सोबतच येथे 'जादुचे फुल' ही संगमरवरावर केलेली कलाकुसरही पाहण्यास मिळते. यामधे फुल आणि त्यावर उडणारी फुलपाखरे यांचे कोरीवकाम आहे.
4. सुख महाल किंवा सुख मंदीर
सुख महाल म्हणजेच राजाच्या वास्तव्याची जागा. सुख महाल हे शेष महाल पासुन जवळच आहे. येथील वातावरण थंड ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था केलेली आपल्याला पाहण्यास मिळते, ज्यामुळे तिव्र उन्हाळ्यात देखील येथील वातावरण थंड राहते. सुख महालच्या भिंतींवर आपल्याला मुघल कलाकुसरीची छाप दिसते.
5. जनेना देऊरी
जनेना देऊरी म्हणजेच राजवाड्यातील तो भाग जेथे राण्या आणि राजघराण्यातील इतर स्त्रिया राहत असे. जनेना या शब्दाचाच अर्थ स्त्रि असा होतो. या ठिकाणी राण्यांचे कक्ष आहेत, राण्यांच्या वयक्तीक सहाय्यक स्त्रिया देखील येथे राहात होत्या.
या ठिकाणी मानसिंग महाल देखील आहे. मुघल साम्राज्याचा शासक अकबर जेव्हा अमेर शहरात आला त्यावेळी हा महाल बांधण्यात आला. येथील भिंतींवर एक दगड आहे, या दगडावर अकबराने दिलेला संदेश पारसी भाषेत कोरलेला आहे.
6. अमेर किल्ल्यापासून जयगढ किल्यापर्यंतचा भुयारी मार्ग
अमेर किल्ल्यापासून जयगढ किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी एक भुयारी मार्ग अमेर किल्ल्यामध्ये आहे. या भुयारी मार्गाचा शोध अलीकडेच लागला. या मार्गाबाबत अनेक वर्ष कोणालाच महिती नव्हती. संकटकालीन परीस्थितीमधे सुरक्षेसाठी या भुयारी मार्गाचा वापर केला जात असे. हा भुयारी मार्ग दिवाने आम, मानसिंग महाल तसेच जनेना देऊरी या ठिकाणांना जोडतो. भुयारी मार्ग पर्यटकांसाठी खुला आहे. तुम्ही या मार्गाद्वारे जयगढ किल्ल्यापर्यंत जाउ शकता.
7. शिला माता मंदिर
अमेर किल्ल्यामध्ये शिलादेवीचे मंदीर आहे. या मंदिरामागील रोचक इतिहास जाणुन घ्यायला तुम्हाला नक्की आवडेल.
महाराजा मानसिंगाचे राजा केदार सोबत युद्ध झाले, या युद्धामधे महाराजा मानसिंगचा पराभव झाला. आपला पराभव झाला म्हणुन महाराजा मानसिंग बेचैन झाला आणि त्याने काली देवीची पुजा करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर एके दिवशी काली देवी महाराजा मानसिंगाच्या स्वप्नात आली. काली देवीने महाराजा मानसिंगास अमेर किल्यात एक मंदीर बांधण्यास सांगितले, तसेच आपली हरवलेली मुर्ती जेस्सोर (बांगलादेशातील एक शहर) येथील समुद्रकिनाऱ्यावरुन आणन्यास सांगितली. आणि महाराजा मानसिंगास युद्धामधे विजय मिळेल असा आशिर्वाद दिला.
महाराजा मानसिंग काली देवीची प्रतीमा शोधण्यासाठी जेस्सोरला गेला, जेथे त्याला एक शिला मिळाली. मानसिंगाने ही शिला आपल्या राजवाड्यात आणली. जेव्हा मानसिंगाने हि शिला व्यवस्थीतपने धुतली तेव्हा या शिलेवर मानसिंगास काली देवीची प्रतीमा दिसली. यामुळे या देवीचे नाव शिलादेवी असे पडले. त्यानंतर महाराजा मानसिंगाने अमेर किल्यामधे शिलादेवीचे मंदीर बनवले.
शिलादेवी मंदीर हे मक्राना संगमरवरापासुन बनवले गेले आहे. मक्राना संगमरवर हा जगातील सर्वात उच्चप्रतीच्या संगमरवरापैकी एक मानला जतो. या मंदीरात चांबड्यापासुन बनविलेल्या वस्तु, मोबाईल फोन, कॅमेरा, पाकीट तसेच चपला घेऊन जान्यास परवानगी नाही.
8. नक्कार खाना
नक्कार म्हणजेच नगाडा. नगाडा हा शब्द ऐकल्यावर आपल्याला लगेचच संगिताची आठवन होते, यावरुन तुम्ही नक्कार खाना त्यावेळी कशासाठी वापरला जात असेल याचा अंदाज लाऊ शकता. नक्कार खाना या ठिकाणी त्याकाळी राजदरबारातील लोक संगिताचा आनंद घेत. संगितकार या ठिकाणी विविध वाद्यांचा वापर करुन मनमोहक संगित वाजवत असत.
9. हमाम / बाथ
हमाम हे ते ठिकाण आहे जेथे राजघराण्यातील लोक स्नान करण्यासाठी येत. त्याकाळी तंत्रज्ञान एवढे आधुनिक नव्हते तरीही, स्नानासाठी थंड पाणी आणि गरम पाणी असा पर्याय येथे उपलब्ध असायचा. येथील न्हानीघर हे मक्राना संगमरवरापासुन बनवलेले आहे. या ठिकाणास पर्यटक जास्त पसंती देत नाहीत.
10. दिलराम बाग
हा बगिचा अमेर किल्ल्याच्या खालील बाजूस आहे. अमेर किल्ल्यात प्रवेश घेण्यासाठी आपल्याला या बागिचातुनच जावे लागते. दिलराम बाग म्हणजेच 'चार बाग' या मुघल कलेचे उदाहरण. डाव्या बाजूला लाल वाळुच्या खडकांद्वारे बनविलेली सुंदर इमारत तुम्हाला दिसेल. तुम्हाला चांगले फोटो हवे असतील तर येथे आवर्जुन भेट द्या.
11. जलेब चौक
जलेब चौक हा तो परीसर आहे जिथे सैनिक व सेनानायक महत्त्वाच्या प्रसंगी एकत्र येत. जलेब हा मध्य पुर्वेकडील शब्द आहे याचा अर्थ ती जागा जेथे सैन्य एकत्र येते. या परीसरात येण्यासाठी फक्त दोन मार्ग आहेत, सुरजपोल दरवाजा आणि चांदपोल दरवाजा.
अमेर किल्ल्याची वेळ
अमेर किल्ला दिवसा सकाळी 8:00 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत खुला असतो. अमेर किल्ल्यास रात्रीच्या वेळीही भेट देता येते. अमेर किल्ला रात्री 6:30 पासुन ते रात्री 9:30 पर्यंत उघडा असतो.
जयपुर पासुन अमेर किल्ल्यापर्यंत कसे जाल
अमेर किल्ला जयपुर पासुन 11 किमी अंतरावर आहे. स्वतःच्या वाहनाने अमेर किल्ल्यापर्यंत पोहोचण्यास 20 मिनीटे लागतात. तुम्ही जयपुर पासुन ते अमेर किल्ल्यापर्यंत बसद्वारेही जाऊ शकता, यासाठी तुम्हाला जयपुर मधील बडी चौपर येथे बस मिळेल.
अमेर किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑटोरिक्षा तसेच टॅक्सी सुद्धा उपलब्ध आहे. तुम्ही उबेर किंवा ओला द्वारे देखील अमेर किल्ल्यापर्यंत पोहोचु शकता.
अमेर किल्ल्यामधील प्रवेश फी
अमेर किल्ल्यातील प्रवेश फी ही भारतीय पर्यटकांसाठी 100 रुपये तर विदेशी पर्यटकांसाठी 500 रुपये आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश फी मधे सुट मिळते, परंतु यासाठी विद्यार्थी ओळखपत्र अनिवार्य आहे. भारतीय विद्यार्थ्यांना प्रवेश फी 10 रुपये तर विदेशी विद्यार्थ्यांना ही 100 रुपये आहे.
भेट देण्यासाठी जयपुर मधील इतर ठिकाणे
अमेर किल्ल्यासोबतच जयपुरमधील इतर पर्यटन स्थळे देखील तुम्ही पाहु शकता.
1. जगत शिरोमनी मंदिर
जगत शिरोमनी मंदीरामधे तुम्हाला अत्यंत सुंदर कोरीव काम पाहण्यास मिळेल. हे मंदिर बांधण्यासाठी विविध प्रकारच्या दगडांचा वापर करण्यात आला आहे. या मंदीराच्या बांधकामामागे एक रोचक कथा देखील आहे.
2. अंबिकेश्वर महादेव मंदीर
अंबिकेश्वर महादेव मंदीर हे शिवशंकराचे मंदीर आहे. या मंदीराबाबत खास गोष्ट म्हणजे या मंदीराचे बांधकाम जमिनीच्या पातळीपेक्षा खाली आहे, यामुळे पावसाळ्यात हे मंदीर पाण्याखाली जाते.
3. जयगड किल्ला
जयगड किल्ला हा अमेर किल्ल्यास सुरक्षा देण्यासाठी बांधण्यात आला होता. यामुळे जयगड किल्ला अमेर किल्ल्यापेक्षा उंचावर बांधण्यात आला आहे. अमेर किल्ला आणि जयगड किल्ला एका बोगद्याद्वारे जोडलेले देखील आहेत. अमेर किल्ल्यातुन तुम्ही बोगद्याद्वारे जयगड किल्ल्यापर्यंत जाऊ शकता.
0 टिप्पण्या