आगा खान पैलेस 1892 मध्ये पुण्यात सुलतान मोहम्मद शाह आगा खान तिसरा यांनी बांधला होता. आगा खान पैलेस हा 19 एकर क्षेत्रात पसरलेला आहे. या जागेला ऐतिहासिक महत्त्व आहे. आगा खान पैलेस ही एक भव्य इमारत आहे.ह्या राजवाड्याचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी जवळचा संबंध आहे. महात्मा गांधी, त्यांची पत्नी कस्तुरबा गांधी, त्यांचे सचिव महादेव देसाई आणि सरोजिनी नायडू यांना येथे कैद करुन ठेवण्यात आले होते. कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांचे येथे निधन झाले. 2003 मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेने ही जागा भारतातील महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित केली.
आगा खान पैलेस |
विशिष्ट वास्तुकलामुळे आणि हिरव्यागार वातावरणामुळे आगा खान पैलेस हे ठिकाण विविध प्रकारच्या फोटो शूटसाठी फोटोग्राफरचे आकर्षण ठरले, परंतु छायाचित्रणाचे व्यावसायीकरण वाढल्याने पर्यटकांना त्रास होउ लागला, यामुळे व्यवस्थापनाने येथील आवारात कोणत्याही प्रकारची छायाचित्रण परवानगी देणे बंद केले. आगा खान पैलेसच्या परिसरात मोबाईल छायाचित्रण देखील प्रतिबंधित आहे.
जानुन घेऊ आगा खान पैलेसचा इतिहास
ऐतीहासीकदृष्ट्या, या वाड्याला मोठे महत्त्व आहे. महात्मा गांधी, त्यांची पत्नी कस्तूरबा गांधी आणि त्यांचे सचिव महादेव देसाई यांना भारत छोडो आंदोलन सुरू झाल्यानंतर 9 ऑगस्ट 1942 ते 6 मे 1944 पर्यंत या राजवाड्यात कैद केले गेले. वाड्यात कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांचे कैदेदरम्यान निधन झाले आणि त्यांची समाधीही राजवाड्यात आहे.
दुष्काळग्रस्त भागातील लोकांना रोजगार मिळावा म्हणून सुलतानाने राजवाडा बांधला होता. म्हणून त्याने 1000 लोकांना नोकरी दिली आणि पाच वर्षात राजवाडा बांधला.हा राजवाडा 12 लाख रुपयांमध्ये बांधला गेला. एकूण क्षेत्रफळ 19 एकर आहे. यात 7 एकर मधे राजवाडा आहे आणि उरलेल्या जागेत बगीचा आहे. 1970 च्या दशकाच्या सुरूवातीस राजवाड्यात नॅशनल मॉडेल स्कूल होते. गांधी आणि त्यांच्या तत्वज्ञानाबद्दल आदर दर्शविण्यासाठी आगा खान 4 यांनी आगा खान पैलेस भारतीय लोकांना दान केला. पंतप्रधान इंदिरा गांधींनी 1974 मध्ये आगा खान पैलेसला भेट दिली होती. येथे त्यानी देखभाल दुरुस्तीसाठी दरवर्षी दोन लाख रुपयांची रक्कम दिली. हि रक्कम 1990 पर्यंत दहा लाखांपर्यंत वाढवण्यात आली.
आगा खान पैलेसची इमारत
आगा खान वाड्यात इटालियन कमानी आणि प्रशस्त लॉन आहे. या इमारतीत पाच हॉल आहेत. हा वाडा 19 एकर क्षेत्रामध्ये आहे आणि त्यापैकी 7 एकर हे अंगभूत क्षेत्र आहे. हा राजवाडा प्रेक्षकास त्याच्या भव्यतेने व नयनरम्य वास्तूने मोहित करतो. तळ मजल्याचे क्षेत्रफळ 1756 चौ.मी. आहे, पहिल्या मजल्याचे क्षेत्रफळ 1080 चौ.मी. आहे, तर दुसर्या मजल्याचे बांधकाम 445 चौ.मी. आहे. या संरचनेचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण इमारतीच्या सभोवतालचे 2.5 मीटरचे कॉरिडॉर. प्रिन्स करीम आगा खान यांनी 1972 मध्ये गांधी स्मारक समितीला हा राजवाडा दान केला.
या राजवाड्यात असंख्य फोटो आणि पोर्ट्रेट संग्रहित आहेत ज्यात भारताचे जनक महात्मा गांधी आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील इतर व्यक्तिरेखांच्या जीवनातील झलक दिसते.
कधी भेट द्यावी
राष्ट्रीय सुट्टी वगळता सर्व दिवशी आगा खान पैलेस खुला असतो. सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत हा राजवाडा चालू असतो.
कसे जाल
पुणे हे शहर मुंबईपासून २०० कि.मी. अंतरावर आहे आणि महाराष्ट्रातुन व राज्याच्या बाहेरुन रेल्वे व विमानाने चांगले जोडलेले आहे. पुणे येथे नियमितपणे राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) बस तसेच खाजगी बसेस येतात. पुण्यात फिरन्यासाठी ऑटो रिक्षा व टॅक्सी उपलब्ध आहेत. तुम्ही खालील नकाशा पाहु शकता.
भेट देण्यासाठी जवळची ठिकाणे
1) शनिवार वाडा
2) सिंहगड किल्ला
3) कात्रज येथील सर्प उद्यान
0 टिप्पण्या