वेरुळची लेणी महाराष्ट्र राज्याच्या औरंगाबाद जिल्ह्यात आहे. युनेस्कोने वेरुळ येथील लेण्यांना जागतिक वारसा म्हणून स्थान दिले आहे. ईसवी सन 600 ते 800 या काळात स्थानिक खडकातून वेरुळ लेण्या कोरल्या गेल्या. इ.स. 800 मधील सर्वात नेत्रदीपक उदाहरण म्हणजे कैलाश मंदिर, जे 32 मीटर उंच आहे, हे जगातील सर्वात मोठे खडक कोरुन बनवीलेले स्मारक आहे. कैलाशाचे मंदिर, भगवान शिव यांना समर्पित रथाच्या आकाराचे स्मारक आहे. येथे 100 हून अधिक लेण्या आहेत, त्या सर्व चरणाद्री डोंगरातील बेसाल्टच्या उंच खडकापासुन बनवलेल्या आहेत, त्यापैकी 34 लेण्या पर्यटकांसाठी खुल्या आहेत. यामध्ये 12 बौद्ध (लेणी 1 ते 12), 17 हिंदू (लेणी 13 ते 29) आणि 5 जैन (लेणी 30 ते 34) लेण्या आहेत. या लेण्या एकमेकांच्या अगदी जवळ बांधलेल्या आहेत आणि प्राचीन भारतात अस्तित्त्वात असलेल्या धार्मिक सुसंवादाचे वर्णन करतात.
सर्व वेरुळ लेण्या राष्ट्रकूट घराण्यासारख्या हिंदू राजवटीमध्ये बांधल्या गेल्या, ज्यांनी हिंदू आणि बौद्ध लेण्यांचा काही भाग बांधला. आणि यादव वंश, ज्यांनी अनेक जैन लेण्या तयार केल्या. स्मारकांच्या बांधकामासाठी व्यापारी आणि प्रदेशातील श्रीमंत यांनी निधी पुरविला. आज, जवळच्या अजिंठा लेण्यांसह, वेरुळ लेण्या महाराष्ट्रातील मराठवाडा प्रदेशातील पर्यटकांचे एक प्रमुख आकर्षण आहेत आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थे अंतर्गत संरक्षित स्मारक आहेत.
बौध लेण्या (लेणी 1 ते 12)
या लेण्या दक्षिणेकडील बाजूला आहेत आणि इ.स. 630 ते 700 दरम्यान बांधल्या गेल्या आहेत. पहिल्यांदा असा विचार केला गेला होता की बौद्ध लेण्या या पाचव्या आणि आठव्या शतकाच्या दरम्यान तयार केलेल्या सर्वात पूर्वीच्या लेण्या आहेत, परंतु नवीन महितीनुसार आता हिंदू लेण्यांचे बांधकाम बौद्ध लेण्यांपूर्वीचे मानले गेले आहे. बारा बौद्ध लेण्यांपैकी अकरा प्रार्थना हॉल असलेले मठ आहेत. यामध्ये डोंगराच्या तोंडावर कोरलेल्या मोठ्या बहुमजली इमारती, राहन्याच्या खोल्या, झोपेच्या जागा, स्वयंपाकघर आणि इतर खोल्यांचा समावेश आहे.
मठातील लेण्यांमध्ये गौतम बुद्ध, बोधिसत्व आणि संतांच्या कोरीव मूर्ती आहेत. यातील काही लेण्यांमध्ये मूर्तिकारांनी दगडाला लाकडाचे रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. लेणी क्रमांक 5, 10, 11 आणि 12 या स्थापत्य कौशल्याच्या द्रुष्टीने महत्त्वाच्या बौद्ध लेणी आहेत. लेणी 5 एलोरा लेण्यांमध्ये अद्वितीय आहे कारण या लेणीस हॉलच्या रूपात डिझाइन केले गेले होते ज्याच्या मध्यभागी समांतर बेंचेस आहेत आणि मागील बाजूस बुद्ध मूर्ती आहे.
हिंदु लेण्या (लेणी 13 ते 29)
सहाव्या शतकाच्या मध्यापासून ते आठव्या शतकाच्या अखेरीस दोन टप्प्यांत हिंदु लेण्या तयार करण्यात आल्या. सहाव्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात नऊ गुफा मंदिरांची निर्मीती करन्यात आली. लेण्यांवर क्रमाने काम करण्यात आले, सुरुवातीला लेणी 28, 27 आणि 19 बनवीन्यात आल्या. त्यानंतर लेणी 29 आणि 21 या लेण्या लेणी क्रमांक 20 आणि 26 सोबत बांधण्यात आल्या. लेण्या 14,15 आणि 16 या राष्ट्रकुटाच्या काळात बांधल्या गेल्या, त्यापैकी काही आठव्या ते दहाव्या शतकाच्या आहेत.
हिंदूं लेण्यांचे काम हे जैन आणि बौद्ध लेण्यांपूर्वी सुरू झाले होते. या सुरुवातीच्या लेणी हिंदु देवता शिवशंकर यांना अर्पण केल्या गेल्या होत्या. येथील मुर्ती पाहुन असे सूचित होते की कारागिरांनी हिंदू धर्माच्या इतर देवी-देवतांनाही समान आदर दिला. या लेण्यांमधील मंदिरांचे एक सामान्य वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या मध्यभागी एक शंकराची पिंड आहे आणि बाजुने प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा दिलेली आहे.
जैन लेण्या (लेणी 30 ते 34)
उत्तर टोकाला पाच जैन लेण्या आहेत. या लेण्या नवव्या आणि दहाव्या शतकाच्या सुरूवातीस बनवल्या गेल्या. या लेणी बौद्ध व हिंदू लेण्यांपेक्षा लहान आहेत पण त्यांत अत्यंत तपशीलवार कोरीव काम आहे. त्या आणि नंतरच्या काळातील हिंदू लेण्या एकाच वेळी बनविल्या गेल्या. खांबाचा व्हरांडा, सममितीय मंडप या वास्तूशास्त्रीय कल्पना यातुन पाहन्यास मिळतात. जैन मंदिरांमधील कामांमध्ये देवी-देवता, यक्ष, यक्षी आणि मानवी भक्तांच्या कोरलेल्या मूर्तींचा समावेश आहे.
छोटा कैलाश (लेणी 30, 4 खोल्या), इंद्रसभा (लेणी 32, 13 खोल्या ) आणि जगन्नाथ सभा (लेणी 33, 4 खोल्या) हि महत्त्वाची जैन मंदिरे आहेत. लेणी 31 मधे चार खांब असलेला एक हॉल आणि मंदिर आहे. लेणी 34 ही एक छोटी लेणी आहे, जिच्यामध्ये लेणी 33 च्या डाव्या बाजुने प्रवेश केला जाऊ शकतो.
कसे जाल
वेरुळ लेण्या भारताच्या महाराष्ट्र राज्यात औरंगाबाद शहराच्या उत्तर पछीमेला आहेत. औरंगाबाद अजिंठापासून 100 किमी आणि वेरुळपासुन 30 किमी अंतरावर आहे. अजंठा वेरुळ लेण्यांना भेट देन्यासाठी आपण स्थानिक टॅक्सी भाड्याने घेऊ शकता किंवा राज्य परीवहन बसेसमधून प्रवास करू शकता. औरंगाबाद आणि मुंबईला जोडणारा महामार्ग हा दिल्ली, इंदोर, विजापूर, उदयपूर आणि जयपूर अशा विविध शहरांशी चांगला जोडलेला आहे.
औरंगाबाद हे रेल्वेमार्गाने मुंबई आणि पुण्याला चांगले जोडलेले आहे. जळगाव स्टेशन हे वेरुळला सर्वात जवळचे प्रमुख रेल्वे स्टेशन आहे. आपण या स्थानकावर उतरल्यास अजिंठा आणि वेरुळ लेण्यांना भेट देन्यासाठी स्थानिक वाहतुकीची व्यवस्था करु शकता. अधीक माहीतीसाठी खालील नकाशा पहा.
भेट देण्यासाठी जवळची ठिकाणे
1) अजिंठा लेणी
2) बीबी का मखबरा
3) पानचक्की
0 टिप्पण्या